
नाशिक, 13 सप्टेंबर (हिं.स.)।
पंचवटीतील म्हसरूळ परिसरातील दिंडोरी रोडवर रविवारी (दि. १३) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास एसटी बसच्या चाकाखाली आल्याने अज्ञात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
गजपंथ कॉलनीसमोरील बजाज शोरूमजवळ नाशिकहून कळवणकडे जाणारी एसटी बस (एमएच १४ एमएच १४७२) आणि मोटारसायकल (एमएच १५ जेटी ९३३८) एकाच दिशेने जात असताना हा अपघात झाला. मोटारसायकल बसच्या चाकाखाली आल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटलेली नव्हती.
अपघाताची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहने ताब्यात घेतली. अपघातामुळे दिंडोरी रोडवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून, पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI