पाटोदा येथील मुक्कामी येणाऱ्या बांधवासाठी घराघरातून भाकरी, भाजी आणि तेल चटणी देण्याचा निर्णय
बीड, 13 सप्टेंबर (हिं.स.)। महेंद्रवाडी/गारमाथा हे दीडशे-पाऊणेदोनशे उंबऱ्याचे गाव. शेती म्हणाल खर्डा बर्डाचा परिसर. संपूर्ण शेती बेभरवशाची. जवळपास ९० टक्के लोक उस तोडणीच्या कामाला जातात. कष्टाने पोट भरणाऱ्या या मंडळीला मनोज जरांगे पाटील यांचा मुंब
अ


बीड, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

महेंद्रवाडी/गारमाथा हे दीडशे-पाऊणेदोनशे उंबऱ्याचे गाव. शेती म्हणाल खर्डा बर्डाचा परिसर. संपूर्ण शेती बेभरवशाची. जवळपास ९० टक्के लोक उस तोडणीच्या कामाला जातात. कष्टाने पोट भरणाऱ्या या मंडळीला मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईला निघण्याचा आदेश आला.

पाटोदा येथे तालुका स्तरावर नियोजन बैठक संपन्न झाली. यानंतर गावात बैठक घेण्यात आली. पाटोदा येथील मुक्कामी येणाऱ्या बांधवासाठी घराघरातून भाकरी, भाजी आणि तेल चटणी देण्याचा निर्णय घेतला. पिढ्यानपिढ्या पंढरीची वारी ज्या मार्गाने जाते त्या भागातील लोक वारकऱ्यांची सेवा करतात अगदी आता ही मराठा समाजाची मुंबई वारी आपल्या भागातून जात असून आपण कमी पडले नाही पाहिजे ही भावना गावकऱ्यांची दिसते. हीच परिस्थिती गावागावात आहे. हा मुद्दा झाला सेवेचा. तर गावातून मुंबईला जाण्यासाठी ग्रामस्थांनी सप्ताहाची जी वर्गणी शिल्लक ठेवली आहे त्यातून तब्बल एक लाख रूपय टेम्पो, ट्रक आणि वाहनासाठी देऊ केले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande