यवतमाळमध्ये विधीमंडळ अंदाज समितीच्या मागावर खबऱ्यांचे ‘नेटवर्क’?
यवतमाळ , 13 सप्टेंबर (हिं.स.)। वाहनांचे फोटो ग्रुपवर व्हायरल; वेळोवेळी पुरवली माहिती विधीमंडळ अंदाज समितीसमोर पितळ उघडे पडेल, अशी भीती अधिकारी, कर्मचार्!यांमध्ये होती. त्यामुळे समिती सदस्यांच्या वाहनांच्या मागावर चक्क ‘खबरी’ सोडण्यात आल्याची चर्च
समितीच्या मागावर खबऱ्यांचे ‘नेटवर्क’?


यवतमाळ , 13 सप्टेंबर (हिं.स.)।

वाहनांचे फोटो ग्रुपवर व्हायरल; वेळोवेळी पुरवली माहिती

विधीमंडळ अंदाज समितीसमोर पितळ उघडे पडेल, अशी भीती अधिकारी, कर्मचार्!यांमध्ये होती. त्यामुळे समिती सदस्यांच्या वाहनांच्या मागावर चक्क ‘खबरी’ सोडण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. ज्या दिशेने समितीचे वाहने जात होते, त्याचे फोटो ग्रुपवर पाठवून सर्वांना अवगत केल्याचा प्रकारही व्हायरल फोटोमुळे दिसून आला.

२७ आमदारांची विधीमंडळ अंदाज समितीचा दौरा निश्चित झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. समिती अध्यक्षासह सहाच सदस्य गुरुवारी जिल्ह्यात आले. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, शाळा, आश्रमशाळा, वसतिगृह, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय आदी ठिकाणची पाहणी तसेच आढावा घेणार असल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले होते. समिती सदस्यांच्या भेटीप्रसंगी कारभार उघडा पडेल, अशी भीती शिक्षक, ग्रामसेवकांसह इतरही अधिकार्!यांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे समिती कुठल्या वेळी कुठे आहे, याची इत्थ्यंभूत माहिती संकलन करण्याचा खटाटोप अनेकांनी केल्याची चर्चा आहे. समितीचे वाहने ज्या तालुक्यात निघाली, तेव्हाच फोटो काढून थेट शिक्षक, ग्रामसेवकांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केल्या जात होता. त्याचप्रमाणे मॅसेज टाकून अवगत केल्या जात होते. एकंदरीत समितीच्या मागावरच अप्रत्यक्षपणे ‘खबर्!यांचे’ नेटवर्क केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

सुट्ट्या गेल्याने सर्वत्र संतापाची लाट

विधीमंडळ अंदाज समितीचा निर्धारित दौरा पहिल्यांदा रद्द झाला होता. त्यानंतर निघालेल्या दुसर्!या वेळापत्रकानुसार समितीचे आगमन चक्क पोळ्याच्या दिवशी झाले. समितीच्या येण्यामुळे चक्क पोळा, तान्हा पोळ्याच्या सुट्टीवर विरजण पडले. या प्रकारामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली होती.

-------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande