
छत्रपती संभाजीनगर, 13 सप्टेंबर (हिं.स.) जिल्हा परिषद अंतर्गत येणारा पोखरी–पारदेश्वर मंदिर ते पोखरी रस्ता डांबरीकरण तसेच पळशी तांडा नं. १ ते सुंदरवाडी रस्ता डांबरीकरण या महत्त्वपूर्ण विकासकामांचा भूमिपूजन समारंभ आज उत्साहात संपन्न झाला.
रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी
पारदेश्वर मंदिराजवळ, पळशी–तांडा रोड येथे या विकासकामांचे भूमिपूजन फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. अनुराधाताई अतुल चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री. रामबाबा शेळके, जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. अजिनाथ बाबुराव धामणे, पंचायत समिती सदस्या सौ. निर्मलाताई पळसकर, तसेच सरपंच, उपसरपंच, चेअरमन आणि परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.
गावागावातील रस्ते सक्षम करण्यासोबतच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला अधिक चांगली सुविधा मिळावी, यासाठी विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis