लातूरमध्ये ऐतिहासिक रेल्वेचे आगमन; मराठवाडा–कोकण थेट जोडले
लातूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। ऐतिहासिक क्षण! मराठवाड्यातून थेट कोकणासाठी रेल्वे धावली आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी! नांदेड–सावंतवाडी एक्सप्रेसची पहिली फेरी मराठवाडा आणि कोकणाला थेट रेल्वेने जोडणाऱ्या नांदेड–सावंतवाडी विशेष एक्सप्रेसची पहिली
रेल्वे


लातूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

ऐतिहासिक क्षण! मराठवाड्यातून थेट कोकणासाठी रेल्वे धावली

आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी! नांदेड–सावंतवाडी एक्सप्रेसची पहिली फेरी

मराठवाडा आणि कोकणाला थेट रेल्वेने जोडणाऱ्या नांदेड–सावंतवाडी विशेष एक्सप्रेसची पहिली फेरी आज सुरू झाली. मराठवाड्याच्या रेल्वे इतिहासातील हा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

लातूर रेल्वे स्थानकावर गाडीचे आगमन झाल्यानंतर लोको पायलट मनोहर गोसावी आणि असिस्टंट लोको पायलट सागर लोंढे यांचा दक्षिण मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीचे सचिव समीर गणपती पडवळ, युट्यूबर सोमेश्वर रत्नपारखी तसेच रेल्वे फॅन व इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर अभिषेक सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लातूरचे डेप्युटी स्टेशन मास्टर रवींद्र कुमार यांचाही सत्कार करण्यात आला.

नांदेडहून निघालेली ही विशेष एक्सप्रेस सकाळी ५ वाजता लातूर रेल्वे स्थानकावर दाखल झाली, तर सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

मराठवाड्यातून कोकणासाठी थेट विशेष रेल्वे सेवा सुरू झाल्याने दोन्ही भागांतील प्रवाशांसाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या रेल्वेमुळे मराठवाडा आणि कोकणातील प्रवास, पर्यटन, व्यापार आणि सामाजिक संपर्काला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दक्षिण मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने या ऐतिहासिक रेल्वेचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

मराठवाडा–कोकण विशेष रेल्वेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा आणि भविष्यात मराठवाडा–कोकण रेल्वे सेवा अधिक मजबूत व नियमित व्हावी, अशी अपेक्षा समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

दक्षिण मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा–कोकण रेल्वे जोडणीचा हा क्षण प्रवाशांसाठी आणि रेल्वेप्रेमींसाठी विशेष ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande