नांदेड - देगलूर येथे शिक्षक रत्न पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन
नांदेड, 13 सप्टेंबर (हिं.स.)। देगलूर येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट (शिक्षक सदन), देगलूर यांच्या वतीने आयोजित ‘शिक्षक रत्न पुरस्कार सोहळ्यास’ नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका मीनल खतगावकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रम
अ


नांदेड, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

देगलूर येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट (शिक्षक सदन), देगलूर यांच्या वतीने आयोजित ‘शिक्षक रत्न पुरस्कार सोहळ्यास’ नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका मीनल खतगावकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन केले तसेच उपस्थित शिक्षक बांधवांशी मनमोकळा संवाद साधला.

यावेळी बोलताना मीनल खतगावकर म्हणाले की

गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या कार्याचा सन्मान, त्यांच्या योगदानाची दखल आणि समाजात शिक्षकांविषयी आदराची भावना निर्माण करण्याचे उल्लेखनीय कार्य या मेमोरियलच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. ही गौरवशाली परंपरा निश्चितच प्रेरणादायी आहे.

शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारा नाही, तर पिढ्या घडविणारा, संस्कार रुजविणारा आणि समाजाच्या भविष्याला दिशा देणारा खरा शिल्पकार!म्हणूनच शिक्षकांचा सन्मान म्हणजे ज्ञानाचा, संस्कारांचा आणि उज्ज्वल भविष्याचा सन्मान आहे.या सोहळ्यात पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्व शिक्षक रत्नांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

यावेळी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयसिंह देशमुख, सौ. अनिताताई चोंडे, पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ, शिवाचार्य गुरुजी, गटशिक्षणाधिकारी बालाजी गोडाजी, विस्तार अधिकारी हमीद दौलताबादी, मंगल देशमुख अलुरकर, एकनाथ पाटील वडगावकर, गजानन पाटील मुजळगेकर, कु. भावना दाशेटवार, बसवराज पाटील, संतोष पाटील पूयेड, ज्ञानेश्वर बिराजदार, टोके गुरुजी, सुभाष इंगोले, दिलीप जाधव, सय्यद हबीब, सौ. सुजाता जाधव, राजेश्वर नारलावार, विश्वनाथ पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande