रत्नागिरी : बावनदीजवळ दुचाकीला मोटारीची धडक, स्वार ठार
रत्नागिरी, 13 सप्टेंबर (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी (ता. संगमेश्वर) येथे भरधाव मोटारीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आज सकाळी झालेल्या या अपघातात तेजस विनायक पांचाळ (२४, रा. वेळवंड, रत्नागिरी) असे मृत्यू
रत्नागिरी : बावनदीजवळ दुचाकीला मोटारीची धडक, स्वार ठार


रत्नागिरी, 13 सप्टेंबर (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी (ता. संगमेश्वर) येथे भरधाव मोटारीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

आज सकाळी झालेल्या या अपघातात तेजस विनायक पांचाळ (२४, रा. वेळवंड, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तेजस हा बावनदी येथील पुलावरून वळण घेत असताना मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे तेजस दुचाकीवरून उडून रस्त्यालगत असलेल्या दगडावर आदळला. गंभीर दुखापत झाल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी पडला.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने जखमी तेजसला उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande