छ. संभाजीनगर : केंद्रीय युवक महोत्सव ऑक्टोबरमध्ये होणार
छत्रपती संभाजीनगर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।जिल्हास्तरीय युवक महोत्सवात चार जिल्ह्यातून ३३३ महाविद्यालयांनी नोंदणी तर ३१४ संघ सहभागी झाले. चारही जिल्ह्यातील पारितोषिक विजेते प्रथम तीन संघाना केंद्रीय यमहोत्सवात सहभाग मिळणार आहे. गणेश महोत्सव नंतर केंद
छ. संभाजीनगर : केंद्रीय युवक महोत्सव ऑक्टोबरमध्ये होणार


छत्रपती संभाजीनगर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।जिल्हास्तरीय युवक महोत्सवात चार जिल्ह्यातून ३३३ महाविद्यालयांनी नोंदणी तर ३१४ संघ सहभागी झाले. चारही जिल्ह्यातील पारितोषिक विजेते प्रथम तीन संघाना केंद्रीय यमहोत्सवात सहभाग मिळणार आहे. गणेश महोत्सव नंतर केंद्रीय महोत्सव डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात ५ ते ७ ऑक्टोबर या दरम्यान आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक डॉ कैलास अंभुरे यांनी दिली. तर लोककला महोत्सव जानेवारीत घेण्यात येणार आहे.

जिल्हा युवक महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा घेण्यात आला. यावेळी प्रकुलगुरू डॉ.प्रविण वक्ते, माजी आ.श्रीकांत जोशी, विवेक देशपांडे, प्राचार्य डॉ.वैशाली देशमुख, डॉ.कैलास अंभुरे आदीसह मान्यवर उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande