
छत्रपती संभाजीनगर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थी, उमेदवार व संबंधित हितधारकांशी उच्चस्तरीय टास्क फोर्स २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे संवाद साधणार आहे.
विद्यमान परीक्षा प्रणाली, प्रश्नपत्रिका तयार करणे व वितरण, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, मूल्यमापन व निकाल प्रक्रिया, डिजिटल प्रणाली व बायोमेट्रिक प्रमाणीकरण, सीसीटीव्ही देखरेख, ऑडिट ट्रेल्स, पेपरफुटी व अन्य गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा केंद्रांची किमान मानके, विविध यंत्रणांमधील समन्वय तसेच उमेदवारांसाठी तक्रार निवारण प्रणाली याबाबत सूचना व अभिप्राय अपेक्षित आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त सर्व सूचना व अभिप्रायांचे संकलन करून ते उच्चस्तरीय टास्क फोर्सकडे सादर करण्यात येणार आहेत. या सूचनांचा अभ्यास करून भरती परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्याबाबत शासनास शिफारशी करण्यात येणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis