

नाशिक, 13 सप्टेंबर (हिं.स.)।
शहर आणि जिल्ह्यामध्ये सर्वांचा लाडका असलेल्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरातील आणि जिल्ह्यातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली होती. गणरायाच्या स्वागताची घरोघर लगबग सुरू आहे . तर यावर्षी गणेशोत्सवा वर पावसाचे सावट आहे त्यामुळे आनंदा वरती विर्जन पडण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
गणपती बाप्पा मोरया म्हणत लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी नाशिक मध्ये जिल्ह्यात आणि शहरांमध्ये घरोघरी मोठ्या प्रमाणावर ती उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील गणरायाच्या स्वागताची लगबग सुरू झाली असून जागोजागी मंडप उभारणी आणि डेकोरेशन करण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असल्याचे दृश्य दिसून येते आहे. तर बाजारपेठेमध्ये गणरायाच्या स्वागतासाठी नागरिकांची खरेदी करण्यासाठी धावपळ दिसून येत होती . बाजारपेठेमध्ये यावेळी साहित्यामध्ये सर्वसाधारण 20 टक्क्यापर्यंत वाढ झाल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या सामानांमध्ये देखील दहा ते बारा टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे . नाशिक शहरातील फुल बाजारामध्ये देखील रविवारी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी दिसून येत होती. जिल्ह्यातील फुल बाजारामध्ये देखील पाच टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. नैवेद्य साठी लागणाऱ्या गोड पदार्थांमध्ये तसेच इतर साहित्यांमध्ये देखील यावेळी दहा टक्क्यापर्यंत वाढ झाल्याचे मिठाई व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
एका बाजूला गणेशोत्सवाची तयारी सुरू असताना या वर्षी गणेशोत्सवावरती पावसाचे सावट आहे . वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण 15 किंवा 16 तारखेपर्यंत पाऊस हा मध्यम किंवा जोराचा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस देखील होणार आहे . वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये 11 सप्टेंबर पासूनच पावसाला सुरुवात झाली आहे . गणरायाच्या आगमन होण्याच्या आधीच पावसाला सुरुवात झाल्यामुळे पावसाचे पुन राखून झाल्याने यावेळी गणेशोत्सवाच्या आनंदा वरती विरजणाचे सावट मोठ्या प्रमाणावरती आहे . त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी देखील मोठ्या प्रमाणावर तयारी केल्याचे दिसून येत आहे.
लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी एका बाजूला नागरिकांची तयारी सुरू झाली आहे तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या वतीने देखील तयारी करण्यात येत आहे . पोलीस प्रशासनाने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरांमध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त काहीना करण्यात आलेल्या आहे . त्यामध्ये चार पोलीस उपायुक्त, सात सहाय्यक पोलीस उपायुक्त, यांच्यासह पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक ,सर्वसाधारण 2 हजार पोलीस कर्मचारी , बॉम्बशोधक व नाशक पथक, गुंडा विरोधी पथक, यासह मोठ्या प्रमाणावरती पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागामध्ये पोलीस अधिक्षक डॉ. स्वामी यांच्या नेतृत्वाखाली दोन अप्पर पोलीस अधीक्षक, दहा पोलीस उपाधीक्षक यांच्यासह पोलिस निरीक्षक उपनिरीक्षक व जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पंधराशे पोलीस कर्मचारी होमगार्ड व इतर यंत्रणा कार्यरत करण्यात आलेली आहे . नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI