
हिंगोली, 13 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ‘मराठवाड्याचा विकास… तुमसे ना हो पायेगा!’ या जनआंदोलनांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील हळद संशोधन केंद्राला माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीभेट देऊन पाहणी केली.
अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद असताना प्रत्यक्षात केवळ २०.२० कोटी रुपये निधी मिळाला आहे. शासन निर्णयाअभावी निधी रखडला असून, संशोधनासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळही उपलब्ध नाही. इमारत बांधकाम सुरू असले तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी अपेक्षित संशोधनाला अद्याप गती मिळालेली नाही. शासनाने तातडीने निधी आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून हळद संशोधन केंद्राला पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, अशी भूमिका मांडली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, गोपू पाटील व महिला आघाडी जिल्हा संघटक रेणुका पतंगी यांच्यासह आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis