गणेश चतुर्थीनिमित्त सोमवारी मध्य रेल्वेवरील पीआरएस केंद्रे अर्धा दिवस कार्यरत
मुंबई, १३ सप्टेंबर (हिं.स.) : गणेश चतुर्थी उत्सवाच्या निमित्ताने, सोमवार, दिनांक १४.०९.२०२६ रोजी मध्य रेल्वेवरील प्रवासी आरक्षण प्रणाली केंद्रे अर्धा दिवस कार्यरत राहतील. या दिवशी पीआरएस केंद्रे रविवारच्या वेळापत्रकानुसार चालतील, म्हणजेच ती केवळ अ
प्रवासी आरक्षण प्रणाली केंद्रे


मुंबई, १३ सप्टेंबर (हिं.स.) : गणेश चतुर्थी उत्सवाच्या निमित्ताने, सोमवार, दिनांक १४.०९.२०२६ रोजी मध्य रेल्वेवरील प्रवासी आरक्षण प्रणाली केंद्रे अर्धा दिवस कार्यरत राहतील.

या दिवशी पीआरएस केंद्रे रविवारच्या वेळापत्रकानुसार चालतील, म्हणजेच ती केवळ अर्धा दिवसच कार्यरत असतील. विशेषतः, सर्व पीआरएस केंद्रांची दुसरी पाळी (दुपारी २.०० ते रात्री १०.०० या वेळेतील कामकाज) बंद राहील. तथापि, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून, आपत्कालीन सेवांसाठी पुरेश्या खिडक्या सुरू ठेवण्यात येतील.

मध्य रेल्वे प्रवाशांना विनंती करते की त्यांनी त्यानुसार आपल्या तिकीट आरक्षणाचे नियोजन करावे; रेल्वे प्रशासनाला या उत्सवाच्या काळात प्रवाशांचे सहकार्य अपेक्षित आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande