रत्नागिरीत दीड लाखांहून अधिक घरगुती, 125हून अधिक सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना
रत्नागिरी, 13 सप्टेंबर (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात दीड लाखाहून अधिक घरगुती, तर सव्वाशेहून अधिक सार्वजनिक गणेशमूर्तींची सोमवारी, दि. १४ सप्टेंबर रोजी प्रतिष्ठापना केली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणरायाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्या
रत्नागिरी जिल्ह्यात दीड लाखाहून अधिक घरगुती, सव्वाशेहून अधिक सार्वजनिक गणेशमूर्तींची सोमवारी प्रतिष्ठापना


रत्नागिरी, 13 सप्टेंबर (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात दीड लाखाहून अधिक घरगुती, तर सव्वाशेहून अधिक सार्वजनिक गणेशमूर्तींची सोमवारी, दि. १४ सप्टेंबर रोजी प्रतिष्ठापना केली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणरायाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिल्ह्यातील सर्व सतरा पोलीस ठाण्यांच्या कार्यकक्षेत एक लाख ६२ हजार घरगुती, तर १२७ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार आहे.

गणेश चतुर्थी सोमवारी असल्याने गावागावांत गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. घरगुती गणपतींच्या आगमनासाठी नागरिकांकडून घरांची स्वच्छता, सजावट तसेच पूजासाहित्याची तयारी करण्यात येत आहे. विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनही मंडप उभारणी, विद्युत रोषणाई, सजावट आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे. सुमारे पावणेदोशने एसटी गाड्या आणि कोकण रेल्वेच्या ३५ हून अधिक जादा गाड्यांमधून चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. आज सर्वाधिक चाकरमानी आले असून आणखी काही चाकरमानी उद्या दाखल होतील. उत्सवासाठी सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande