
नांदेड, 13 सप्टेंबर (हिं.स.)। राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सदिच्छा भेट देऊन बँकेच्या कामकाजाचा, प्रगतीचा व भविष्यातील वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला.सहकार क्षेत्राची भक्कम वाटचाल, शेतकरीहित, बँकेची आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल आणि भविष्यातील विकासाचे नियोजन याबाबत यावेळी महत्त्वपूर्ण चर्चा व सकारात्मक संवाद झाला.
मीनल खतगावकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच जिल्हा बँकेस भेट दिल्याबद्दल खा.अशोक चव्हाण साहेबांचा यथोचित सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यांचे मार्गदर्शन आणि शुभेच्छा ही सहकार क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत. यावेळी बँकेचे अध्यक्ष आ.डॉ.तुषार राठोड यांच्यासह आमदार अमरनाथ राजुरकर,संचालक बी. आर .कदम यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अजय कदम,बँकेचे अधिकारी सर्व कर्मचारी उपस्थित होते.
------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis