परभणी : महाडीबीटी पोर्टल १५ सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित
परभणी, 13 सप्टेंबर (हिं.स.)। भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील महाविद्यालयांकडे प्रलंबित असलेले शिष्यवृत्ती अर्ज तातडीने निकाली काढण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत विशेष मोहीम रा
परभणी : महाडीबीटी पोर्टल १५ सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित


परभणी, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील महाविद्यालयांकडे प्रलंबित असलेले शिष्यवृत्ती अर्ज तातडीने निकाली काढण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी महाडीबीटी १.० पोर्टल १० ते १५ सप्टेंबर या कालावधीत कार्यान्वित करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालये तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या महाडीबीटी १.० पोर्टल लॉगिनवर प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती अर्जांची तातडीने कार्यवाही पूर्ण करावी. महाडीबीटी १.० वरील शैक्षणिक वर्ष २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ मधील प्रलंबित अर्जांची संबंधित संस्था व विभाग स्तरावर छाननी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर प्रलंबित अर्जांमधील कागदपत्रे, पात्रता, विद्यार्थ्यांची माहिती तसेच आवश्यक त्रुटींची पूर्तता करून पात्र अर्ज पुढील कार्यवाहीसाठी समाज कल्याण कार्यालय, परभणी येथे तातडीने पाठवावेत. तसेच, विद्यार्थी स्तरावर अर्ज प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांशी संबंधित महाविद्यालयांनी तत्काळ संपर्क साधून आवश्यक त्रुटींची पूर्तता करून घ्यावी. महाडीबीटी १.० पोर्टलवर १० ते १५ सप्टेंबर या कालावधीत नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. नवीन अर्ज केवळ महाडीबीटी २.० पोर्टलवर स्वीकारले जातील. त्यामुळे महाडीबीटी १.० पोर्टलचा वापर प्रामुख्याने पूर्वीपासून प्रलंबित असलेल्या अर्जांची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी करावा. कोणताही पात्र अर्ज प्रलंबित राहणार नाही, याची सर्व संबंधित महाविद्यालयांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजू एडके यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande