परळी वैजनाथ नगर परिषदेकडून व्यापारी संकुलातील दुकानांसाठी ई-लिलावाची घोषणा
बीड, 13 सप्टेंबर (हिं.स.)। परळी वैजनाथ नगर परिषदेकडून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलाजवळ उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलातील उर्वरित १६ दुकानांच्या सार्वजनिक ई-लिलावाची घोषणा करण्यात आलेली आहे. शहरातील व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी ही संधी असून
Q


बीड, 13 सप्टेंबर (हिं.स.)। परळी वैजनाथ नगर परिषदेकडून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलाजवळ उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलातील उर्वरित १६ दुकानांच्या सार्वजनिक ई-लिलावाची घोषणा करण्यात आलेली आहे. शहरातील व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी ही संधी असून इच्छुक व्यापाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविता येणार आहे.

नगर परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपल्या आवडीच्या दुकानाची पाहणी करून नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्या अधिकृत www.mahatenders.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. तसेच डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, शॉप अॅक्ट परवाना अथवा उद्योग प्रमाणपत्र आणि नगरपालिकेचे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व सविस्तर माहिती 28.09. 2026 वेळ सकाळी 11.00 वाजेपर्यंत पाहता व डाऊनलोड करता येईल. निविदा शुल्क ५ हजार रुपये (ना-परतावा) तर अनामत रक्कम ५० हजार रुपये (परतावा) ठेवण्यात आली आहे. प्रत्येक दुकानासाठी स्वतंत्र टेंडर भरावे लागणार असून सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यापाऱ्यास दुकान सोपविण्यात येईल.

प्रत्येक दुकानाचे शासकीय मूल्यांकन किमान २० लाख रुपयांपासून पुढे निश्चित करण्यात आले आहे. पात्र ई-निविदा धारक यांना दिनांक 05.10.2026 रोजी सकाळी 11.00 वाजता ते दुपारी 04.00 या वेळेत ई-लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदविता येईल. हे संकुल डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलाजवळ उभारण्यात आले असून शहरातील व्यापाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची व्यावसायिक संधी आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर परिषद परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande