प्रिन्स रहीम आगा खान पाचवे यांचे राज्यपालांकडून स्वागत
मुंबई, 13 सप्टेंबर (हिं.स.)।शिया इस्माईली मुस्लिम समाजाचे ५०वे इमाम आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे (AKDN) अध्यक्ष प्रिन्स रहीम आगा खान पाचवे यांचे आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे स्वागत केले. आग
प्रिन्स रहीम आगा खान पाचवे यांचे राज्यपालांकडून स्वागत


मुंबई, 13 सप्टेंबर (हिं.स.)।शिया इस्माईली मुस्लिम समाजाचे ५०वे इमाम आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे (AKDN) अध्यक्ष प्रिन्स रहीम आगा खान पाचवे यांचे आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे स्वागत केले.

आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कने हजारो ठिकाणी ‘सूक्ष्म वन’ (Micro Forest) उभारण्याचे उपक्रम हाती घेतले असून, महाराष्ट्रातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्येही अशा उपक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या शक्यता तपासता येतील, असे प्रिन्स रहीम आगा खान यांनी सांगितले.

राज्यातील विद्यापीठांबरोबर पर्यावरण संवर्धन, हवामान कृती आणि संबंधित विषयांवर सहकार्य करण्यास आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कला निश्चितच आवडेल, असे प्रिन्स रहीम आगा खान यांनी सांगितले.

तीव्र हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क ही संस्था भारतातील अनेक शहरांमध्ये हवामान कृती आराखड्यावर काम करीत असून, महाराष्ट्रातील शहरे व नगरांमध्ये नाविन्यपूर्ण शीतकरण उपाययोजना राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमांमुळे स्थानिक समुदायांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात पुणे, मीरा-भाईंदर, चंद्रपूर तसेच अन्य ठिकाणी नेटवर्ककडून हवामान कृती, उत्सर्जन कमी करणे आणि शीतकरण उपाययोजनांच्या क्षेत्रात काम सुरू असल्याची त्यांनी राज्यपालांना माहिती दिली.

वसई परिसरातील तलाव व अन्य जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी देखील आपल्या संस्थांच्या माध्यमातून आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क काम करीत असून, या उपक्रमामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande