बीड - दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा; शेतकऱ्यांच्या हितासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक
बीड, 13 सप्टेंबर, (हिं.स.) आष्टी विधानसभा मतदारसंघातील आष्टी, पाटोदा व शिरूर कासार या तीनही तालुक्यांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पीक पूर्णतः हातातून गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे, त्यामुळे
अ


बीड, 13 सप्टेंबर, (हिं.स.) आष्टी विधानसभा मतदारसंघातील आष्टी, पाटोदा व शिरूर कासार या तीनही तालुक्यांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पीक पूर्णतः हातातून गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्यासोबत आयोजित 'व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक' पार पडली.

या बैठकीत तालुकानिहाय एकूण पेरणी झालेले क्षेत्र, फळबाग लागवड क्षेत्र, तसेच कापूस, तूर, उडीद, सोयाबीन, कांदा, मका यासह अन्य कडधान्य व पिकांबाबत सविस्तर माहिती घेतली. तीनही तालुक्यांतील सर्व पिके पाण्याअभावी जळून गेली असून, एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागण्याची शक्यता उरलेली नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande