संस्थान श्री एकनाथ महाराज यांच्या भक्तनिवासाच्या कामाची खा. संदिपान भुमरेंकडून पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। पंढरपूर येथे संस्थान श्री एकनाथ महाराज यांच्या वतीने नव्याने उभारण्यात येत असलेल्या भव्य भक्तनिवासाच्या कामाची पाहणी शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांनी केली. भक्तनिवासाच्या सुरू असलेल्या कामासोबतच वॉल कंप
क


छत्रपती संभाजीनगर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

पंढरपूर येथे संस्थान श्री एकनाथ महाराज यांच्या वतीने नव्याने उभारण्यात येत असलेल्या भव्य भक्तनिवासाच्या कामाची पाहणी शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांनी केली.

भक्तनिवासाच्या सुरू असलेल्या कामासोबतच वॉल कंपाऊंडच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून कामाची गती वाढविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच बांधकामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये आणि काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, याबाबत आवश्यक सूचना केल्या.

पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांना उत्तम निवास व आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे भक्तनिवासाचे काम नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जात आहे.

यावेळी संस्थान श्री एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाचे विश्वस्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पदाधिकारी तसेच मान्यवर मंडळी उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande