देगलूरमध्ये सिद्धेश्वर पॅराडाईजची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
नांदेड, 13 सप्टेंबर (हिं.स.)। सिद्धेश्वर पॅराडाईज, देगलूर येथे यशवंत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.,ता.देगलूर यांच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस भाजप नेत्या मीनल खतगावकर यांनी उपस्थित राहून सभासद, पदाधिकारी, कर्मचारी व शिक्षक बांधवांशी मनमो
अ


नांदेड, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

सिद्धेश्वर पॅराडाईज, देगलूर येथे यशवंत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.,ता.देगलूर यांच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस भाजप नेत्या मीनल खतगावकर यांनी उपस्थित राहून सभासद, पदाधिकारी, कर्मचारी व शिक्षक बांधवांशी मनमोकळा संवाद साधला.

गेल्या चार दशकांपासून विश्वास, पारदर्शकता आणि सहकाराच्या मूल्यांवर उभी असलेली यशवंत कर्मचारी सहकारी पतसंस्था ही केवळ आर्थिक संस्था नसून कर्मचारी व शिक्षक बांधवांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा विश्वासाचा आधार आहे. संस्थेची ही गौरवशाली वाटचाल भविष्यातही अधिक सक्षम आणि गतिमान व्हावी, सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य मिळावे आणि सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडावे, अशा सदिच्छा व्यक्त करून संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सहकार मजबूत झाला, तर समाज मजबूत होतो; आणि समाज मजबूत झाला, तर विकासाची वाटचाल अधिक वेगाने पुढे जाते. देगलूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक घटकाला सोबत घेऊन, त्यांच्या प्रश्नांना न्याय देत आणि जनतेच्या विश्वासाला सर्वोच्च स्थान देत काम करण्याची माझी भूमिका सदैव कायम राहील.

या प्रसंगी खा. रवींद्र चव्हाण, सभेचे अध्यक्ष दिलीपराव देवकांबळे, नगराध्यक्ष प्रा. बालाजीराव टेकाळे, उपनगराध्यक्ष अंकुश देसाई, प्रीतम देशमुख हाणेगावकर, माजी सभापती संजय आप्पा बेळगे, मंगल देशमुख अलुरकर, बालाजी पाटील थडके आदी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande