अमरावती - ८३ गावांत 'एक गाव एक गणपती'चा संकल्प
अमरावती, 13 सप्टेंबर (हिं.स.) गाव आकाराने लहान असल्याने येथील लोकसंख्या मोजकीच. अशात एका गावात अनेक गणपती बसविणे त्या गावाच्या सामाजिक हिताच्या दृष्टीने धोक्याचे ठरत असल्याचे अनेकवार पुढे आले. त्यामुळे गावात एकोपा जपण्याकरिता महत्त्वाची ठरणारी ''ए
८३ गावांत 'एक गाव एक गणपती'चा संकल्प


अमरावती, 13 सप्टेंबर (हिं.स.)

गाव आकाराने लहान असल्याने येथील लोकसंख्या मोजकीच. अशात एका गावात अनेक गणपती बसविणे त्या गावाच्या सामाजिक हिताच्या दृष्टीने धोक्याचे ठरत असल्याचे अनेकवार पुढे आले. त्यामुळे गावात एकोपा जपण्याकरिता महत्त्वाची ठरणारी 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना अस्तित्वात आली. शासनाने दिलेल्या प्रोत्साहाने ती कायम असून आजच्या स्थितीत जिल्ह्यातील तब्बल ८३ गावात ही संकल्पना कायम आहे. एक गाव एक गणपती ही संकल्पना जरी सोपी वाटत असली तरी तिचे फायदे अनेक आहेत. गावात एकच गणपती बसत असल्याने गावात एकोपा निर्माण होतो. असलेली एकजूट कायम रहाते. एवढेच नाही तर खर्चही मर्यादीत असतो. शिवाय सर्व गाव एका ठिकणी येत असल्याने गावाच्या विकासाच्या दिशेने आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यास मदत होते. असे अनेक फायदे या संकल्पनेतून होत असल्याचे पुढे आले आहे. एवढेच नाही तर सध्या पर्यावरणाच्या वाढत्या समस्येवरही यातून तोडगा काढता येतो. गावात एकच मूर्ती असल्याने येथील जलस्त्रोतात इतर मूर्ती विसर्जित होत नसल्याने त्याची शुद्धता कायम राहत असल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनाही या काळात गावात शांतता राखणे सहज शक्य होते. यामुळे त्याला शासनाकडूनही प्रोत्साहन देण्यात येते.

चार पोलिस ठाणे शून्यावर एक गाव गणपती या संकल्पनेत चार पोलिस ठाणे शून्यावर आहे. यात शहराची हद्द असलेले वर्धा शहर पोलिस ठाणे, रामनगर पोलिस ठाणे, सेलू आणि दहेगाव पोलिस ठाण्यात एकाही गावात एक गाव एक गणपती नाही.

या पोलिस ठाण्यांतर्गत अनेक गावे

जिल्ह्यात असलेल्या पोलिस ठाण्यात अनेक गावात ही संकल्पना राबविली जात आहे. यात सेवाग्राम पोलिस ठाण्यांतर्गत दोन, सावंगीत पाच, सिंदी एक, पुलगाव १५, देवळी पाच, अल्लीपूर तीन, खरांगणा १३, आर्वी चार, आष्टी सात, कारंजा एक, तळेगाव आठ, हिंगणघाट पाच, वडनेर चार, गिरड चार तर समुद्रपूर पोलिस ठाण्यांतर्गत चार गावात ही संकल्पना आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande