मैफलीचे सूर दरवळतच राहतील : डॉ.वैशाली देशमुख
छत्रपती संभाजीनगर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। महोत्सवाची मैफल संपली तरी सूर दरवळतच राहतील, असे संयोजक प्राचार्य डॉ.वैशाली देशमुख म्हणाल्या. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचा इतिहास म्हणजे मराठवाडयाचा शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक चळवळींचे मानाचे प्र
मैफलीचे सूर दरवळतच राहतील : डॉ.वैशाली देशमुख


छत्रपती संभाजीनगर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। महोत्सवाची मैफल संपली तरी सूर दरवळतच राहतील, असे संयोजक प्राचार्य डॉ.वैशाली देशमुख म्हणाल्या. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचा इतिहास म्हणजे मराठवाडयाचा शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक चळवळींचे मानाचे प्रकरण आहे. ऐतिहासिक परंपरा असलेल्या या महाविद्यालयात होत असलेल्या पहिला महोत्सव सर्वांच्या सहकार्याने यशस्वी व संस्मरणीत करु, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी प्राचार्य डॉ.वैशाली संतोष देशमुख म्हणाल्या, १९२३ मध्ये स्थापन झालेले शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय हे मराठवाडयातील पहिले उच्च शिक्षणाचे केंद्र आहे. दोन वर्षांपुर्वीच महाविद्यालयाने शतक महोत्सव साजरा केला. मा कुलगुरू यांनी टाकलेला विश्वास आम्ही सार्थ करू शकलो याचा मनस्वी आनंद आहे. माझे सर्व सहकारी प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थी यांनी अत्यंत मेहनत घेऊन हा महोत्सव यशस्वी करून दाखविला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा ना चंद्रकांतदादा पाटील, प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी व संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव घेण्यात आला, असेही डॉ. देशमुख म्हणाल्या.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande