शिवसेना उबाठाची जनआंदोलनातून दुष्काळ जाहीर करण्याची एकमुखी मागणी
परभणी, 13 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाड्यात महिन्याहून अधिक काळापेक्षा पावसाने उघडीप दिल्याने संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आला आहे. अनेक ठिकाणी पिके करपून गेली आहेत. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पेरणी केलेली असून आता त्यातून खर्चही निघण्याची शक्यता नाही.
Q


परभणी, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

मराठवाड्यात महिन्याहून अधिक काळापेक्षा पावसाने उघडीप दिल्याने संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आला आहे. अनेक ठिकाणी पिके करपून गेली आहेत. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पेरणी केलेली असून आता त्यातून खर्चही निघण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा या जनआंदोलनात आमदार अंबादास दानवे यांनी रविवारी (दि.१३) केली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिवसेनेच्या जनआंदोलनास सुरुवात झाली. या आंदोलनाय शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील, शिवसेना शहराध्यक्ष डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, विष्णू मुरकुटे, महिला जिल्हाध्यक्ष अंबिका डहाळे, महापौर सय्यद इकबाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दानवे म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मागील अनेक वर्ष केवळ मराठवाड्याच्या विकास कामांची घोषणाबाजी केली. प्रत्यक्षात विकास मात्र दिसत नाही. मराठवाड्यातील प्रमुख प्रश्न आजी जैसे थे आहेत. सिंचन, आरोग्य, शिक्षण अशा क्षेत्रात विकासाचा अनुशेष अजूनही मोठा आहे. तो कधी भरून काढणार ? असा सवाल दानवे यांनी यावेळी केला. परभणी जिल्ह्यात पावसाच्या मोठा खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande