युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप - प्र-कुलगुरू डॉ.प्रविण वक्ते, श्रीकांत जोशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचा वंदे मातरम् सभागृहात जल्लोषात समारोप करण्यात आला. प्रकुलगुरू डॉ.प्रविण वक्ते, माजी आ.श्रीकांत जोशी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित
अ


छत्रपती संभाजीनगर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचा वंदे मातरम् सभागृहात जल्लोषात समारोप करण्यात आला. प्रकुलगुरू डॉ.प्रविण वक्ते, माजी आ.श्रीकांत जोशी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघाना पारितोषिक वितरण करण्यात आले.

या महोत्सवाचे उद्घाटन अतुल सावे यांच्या हस्ते तर आले. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. तर समारोप समारंभ प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते अध्यक्षतेखाली झाला. माजी आमदार श्रीकांत जोशी, उद्योजक विवेक देशपांडे, संयोजक प्राचार्य डॉ.वैशाली संतोष देशमुख विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव, जिल्हा समन्वयक डॉ.देवराज दराडे, सांस्कृतिक समन्वयक प्रा.परमेश्वर पुरी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी उद्योजक विवेक देशपांडे, संघप्रमुख डॉ अनिरुद्ध मोरे, तेजस्वी काथार व समीक्षा लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले. निकाल वाचन डॉ समाधान इंगळे व डॉ किशोर शिरसाठ यांनी केले.

मराठवाड्याच्या तरुणांच्या रक्तात संघर्ष अन् कष्ट जन्मजात असून त्यांच्यात प्रचंड गुणवत्ता आहे. त्या गुणवत्तेच्या बळावर आज त्यांनी जगभर नाव मिळवले आहे. आजची जेन जी ही एआय'चे बाप आहेत, असे माजी आमदार श्रीकांत जोशी म्हणाले. सातत्य, चारित्र्य आणि आत्मविश्वास ही यशस्वीतेची त्रिसूत्री आहे.नामविस्तारानंतर पहिल्यांदाच या महाविद्यालयास युवक महोत्सवाचे यजमानपद मिळाले आणि त्यांनी ते यशस्वीपणे आयोजन करून दाखविले, असेही ते म्हणाले.

युवक महोत्सवाचासमारोप होत आहे. पण खरं सांगायचं तर हा शेवट नाही, तर तुमच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. यापैकी काही जण पुढे केंद्रीय स्तरावर जातील, काही राज्यस्तरावर तर काही राष्ट्रीय स्तरावर आपल्या कलेचा ठसा उमटवतील, असे प्रकुलगुरु डॉ. प्रवीण वक्ते म्हणाले. या महोत्सवातून स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. तुमची ओळख केवळ तुमच्या महाविद्यालयाच्या नावाने, पदवीने किंवा गुणांनी होऊ नये. तुमची ओळख तुमच्या कौशल्याने, कर्तृत्वाने आणि व्यक्तिमत्त्वाने झाली पाहिजे. तुमच्याकडे वेळ आहे, ऊर्जा आहे, स्वप्ने आहेत आणि संधीही आहेत. फक्त त्या संधी ओळखण्याची आणि त्यासाठी मेहनत करण्याची गरज आहे. कलावंताची खरी ओळख त्याची आहे. खऱ्या कलावंताची ओळख त्याच्या नावाने किंवा पार्श्वभूमीने नाही, तर त्यांच्या कलेने होते. या दोन दिवसांत तुम्ही हे सिद्ध केले आहे. जिंकणाऱ्याने नम्र राहावे; आणि न जिंकणाऱ्याने थांबू नये. पण ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी निराश होऊ नये, असेही डॉ वक्ते म्हणाले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande