छ. संभाजीनगर : जिल्हा परिषद काढणार ‘प्रशासक राज’च्या ४ वर्षांची श्वेतपत्रिका
छत्रपती संभाजीनगर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील २०२२ ते २०२६ या चार वर्षांच्या प्रशासकीय काळातील कामांची विभागनिहाय श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे. जलजीवन मिशन, शाळा खोल्या दुरुस्ती, सीसीटीव्ही, बांधकामांसह विविध कामांमध
छ. संभाजीनगर : जिल्हा परिषद काढणार ‘प्रशासक राज’च्या ४ वर्षांची श्वेतपत्रिका


छत्रपती संभाजीनगर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील २०२२ ते २०२६ या चार वर्षांच्या प्रशासकीय काळातील कामांची विभागनिहाय श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे. जलजीवन मिशन, शाळा खोल्या दुरुस्ती, सीसीटीव्ही, बांधकामांसह विविध कामांमध्ये गैरप्रकाराचे आरोप झाल्याने अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी सर्व खातेप्रमुखांना आदेश दिले आहेत. कोणत्या गावात, कोणत्या योजनेतून किती निधी खर्च झाला आणि कामे कशी झाली, याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. गटविकास अधिकाऱ्यांनाही गावनिहाय कामांची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले असून, १५ दिवसांत अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत प्रथमच अशा प्रकारे श्वेतपत्रिका काढली जाणार आहे.

------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande