माढ्यात काळविटाची शिकार; मांस विक्री करणाऱ्या दोघांसह तिघांना अटक
सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी येथे संरक्षित वन्यप्राणी असलेल्या काळविटाची शिकार करून त्याचे मांस विक्री करणाऱ्या प्रकरणाचा वन विभागाने पर्दाफाश केला. या कारवाईत मांस विक्री करणाऱ्या दोन भावांसह मांस खरेदी करण्यासाठी
माढ्यात काळविटाची शिकार; मांस विक्री करणाऱ्या दोघांसह तिघांना अटक


सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी येथे संरक्षित वन्यप्राणी असलेल्या काळविटाची शिकार करून त्याचे मांस विक्री करणाऱ्या प्रकरणाचा वन विभागाने पर्दाफाश केला. या कारवाईत मांस विक्री करणाऱ्या दोन भावांसह मांस खरेदी करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला वन विभागाने ताब्यात घेऊन अटक केली. तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले.

वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बुद्रुकवाडी येथील लखन बबन काळे आणि विनोद बबन काळे यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. घराची झडती घेतली असता काळविटाचे मांस विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले.

यावेळी मांस विक्री करणारे दोन्ही भाऊ तसेच मांस खरेदी करण्यासाठी आलेला ज्योतीराम आत्माराम नागटिळक यांना वन पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील कलम २(१६), ९, ३९ आणि ५० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande