सोलापूर - मध्यवर्ती बसस्थानकातून ३० बसेस; जिल्ह्यातील नऊ बसस्थानकांतून अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन
सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने विशेष नियोजन केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती बसस्थानकासह प्रमुख नऊ बसस्थानकांतून तब्बल २७० अतिरिक्त बस
Rajmata Bus ST


सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने विशेष नियोजन केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती बसस्थानकासह प्रमुख नऊ बसस्थानकांतून तब्बल २७० अतिरिक्त बसेस धावणार आहेत.

गणेशोत्सवासाठी शहरासह जिल्ह्यातील अनेक नागरिक मूळगावी जातात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी प्रशासनाने अतिरिक्त बसफेऱ्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातून ३० अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत.

याशिवाय मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, करमाळा, अकलूज, कुर्डूवाडी, बार्शी आणि अक्कलकोट या प्रमुख ठिकाणांहूनही अतिरिक्त एसटी फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

गणरायाच्या आगमनाच्या उत्साहात भाविकांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवासाची सुविधा मिळावी, हा या नियोजनाचा उद्देश आहे. महामंडळाच्या या निर्णयाचे गणेशभक्तांकडून स्वागत होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande