सोलापूर महापालिका, वृक्षविनायक परिवार व गणेशयुग परिवारातर्फे गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने सोलापूर महानगरपालिका, वृक्षविनायक परिवार आणि गणेशयुग परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शाले
सोलापूर महापालिका, वृक्षविनायक परिवार व गणेशयुग परिवारातर्फे गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा


सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने सोलापूर महानगरपालिका, वृक्षविनायक परिवार आणि गणेशयुग परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सात रस्ता परिसरातील इनडोअर स्टेडियम येथे ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.

महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला जंगम, कामगार कल्याण समितीच्या सभापती श्रद्धा पवार, विधी सल्लागार समितीचे सभापती सत्यजित वाघमोडे आणि उद्यान व मंडई समितीचे सभापती राजशेखर पाटील उपस्थित होते.

कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शाडू मातीपासून स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. वृक्षविनायक परिवार, कृष्णाली सेवा सहकारी संस्था, गणेशयुग परिवार तसेच पर्यावरणपूरक गणेशमूर्तीकार जाधव यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मूर्तीनिर्मितीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

वैशाली गुंड, आनंदी विभूते, विकास गोसावी, मनाली जाधव, अभिजली जाधव आणि आर्यन विभूते आदी मूर्तिकारांनी गणेशमूर्ती तयार करण्याच्या विविध टप्प्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाडू मातीच्या मूर्तींचे पर्यावरणीय महत्त्व, मूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण आणि पर्यावरण संवर्धनाची गरज याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी शाडू मातीच्या व पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर वाढावा, जलस्रोतांचे प्रदूषण कमी व्हावे आणि जलचरांचे संरक्षण व्हावे, यासाठी कार्यशाळेत जनजागृती करण्यात आली. ‘माझा गणपती, माझी जबाबदारी आणि माझे पर्यावरण’ हा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande