‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा पाचवा सीझन २६ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर
मुंबई, 16 सप्टेंबर (हिं.स.)। कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण टीमसह प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. लोकप्रिय हास्य कार्यक्रम ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पाचव्या सीझनची अधिकृत घोषणा झाली आहे. निर्मात्यांनी त्याच्या स्ट्रीमिंगची तारीखही
The Great Indian Kapil Show 5 announced


मुंबई, 16 सप्टेंबर (हिं.स.)। कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण टीमसह प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. लोकप्रिय हास्य कार्यक्रम ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पाचव्या सीझनची अधिकृत घोषणा झाली आहे. निर्मात्यांनी त्याच्या स्ट्रीमिंगची तारीखही जाहीर केली आहे. यावेळी शोची थीम ‘हंसी का त्यो-हाहा-हार’ अशी ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये हास्यासोबत सण आणि कौटुंबिक मनोरंजनाचा तडका पाहायला मिळणार आहे.

नवीन सीझनचा एक मजेदार प्रोमोही प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्यामध्ये दिवाळी, ख्रिसमससह अनेक सण आणि हास्य-विनोदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मागील सीझनप्रमाणे यावेळीही कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोवर आणि कीकू शारदा आपल्या लोकप्रिय अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. तर, अर्चना पूरन सिंह आणि नवजोत सिंह सिद्धू पुन्हा एकदा निर्णायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

शोमध्ये यावेळी कोण-कोणते कलाकार पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत, याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. निर्मात्यांनी नवीन सीझनमध्ये कुटुंबासोबत सण साजरे करण्यासोबतच हास्याच्या रंगात रंगण्याचे आश्वासन दिले आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा पाचवा सीझन २६ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. त्याचे नवीन भाग दर शनिवारी रात्री ८ वाजता प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande