पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये कपात; नवे दर लागू
नवी दिल्ली, १७ सप्टेंबर (हि.स.) । केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (एटीएफ) यांच्या निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या अप्रत्याशित नफा करात (विंडफॉल टॅक्स) कपात केली आहे. या कपातीनंतरचे नवे दर लागू झाले आहेत. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या
संग्रहित लोगो


नवी दिल्ली, १७ सप्टेंबर (हि.स.) । केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (एटीएफ) यांच्या निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या अप्रत्याशित नफा करात (विंडफॉल टॅक्स) कपात केली आहे. या कपातीनंतरचे नवे दर लागू झाले आहेत.

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १६ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पंधरवड्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या (एटीएफ) निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये बदल करण्यात आला आहे. या शुल्काचे नवे दर लागू करण्यात आले आहेत.अधिसूचनेनुसार, डिझेलच्या निर्यातीवर रस्ता व पायाभूत सुविधा उपकरासह आकारण्यात येणाऱ्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्काची (SAED) रक्कम आता प्रति लिटर २५ रुपयांवरून कमी करून २० रुपये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विमान इंधन (एटीएफ) निर्यातीवरील SAED प्रति लिटर १९ रुपयांवरून कमी करून १५ रुपये करण्यात आला आहे.

पेट्रोलच्या निर्यातीवरील शुल्कातही कपात करण्यात आली असून, ते आता प्रति लिटर ०.५० रुपये करण्यात आले आहे. यापूर्वीच्या पंधरवड्यात हे शुल्क प्रति लिटर १.५० रुपये होते.

अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, देशांतर्गत वापरासाठी असलेल्या पेट्रोल आणि डिझेलवरील विद्यमान शुल्काच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २७ मार्च २०२६ रोजी डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवर विंडफॉल टॅक्स लागू केला होता. या कराच्या दरांमध्ये प्रत्येक पंधरवड्याला आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीनुसार सुधारणा केली जाते. पेट्रोलच्या निर्यातीवरही १६ मेपासून हा कर लागू करण्यात आला होता.--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande