गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वे २२ विशेष रात्रीच्या उपनगरीय गाड्या चालवणार
मुंबई, 19 सप्टेंबर (हिं.स.) - मध्य रेल्वे गणपती उत्सवाच्या काळात प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ठाणे आणि परतीच्या प्रवासासाठी १८ विशेष रात्रीच्या उपनगरीय गाड्या चालवणार आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मि
मध्य रेल्वे उपनगरीय गाड्या


मुंबई, 19 सप्टेंबर (हिं.स.) - मध्य रेल्वे गणपती उत्सवाच्या काळात प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ठाणे आणि परतीच्या प्रवासासाठी १८ विशेष रात्रीच्या उपनगरीय गाड्या चालवणार आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कल्याण दरम्यानच्या 'मेन लाईन'वर दिनांक २३/२४.०९.२०२६ (बुधवार/गुरुवारची रात्र), दिनांक २४/२५.०९.२०२६ (गुरुवार/शुक्रवारची रात्र) आणि दिनांक २५/२६.०९.२०२६ (शुक्रवार/शनिवारची रात्र) या दिवशी चालवण्यात येतील.

'हार्बर लाईन'वर, केवळ गणपती विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच दिनांक २५/२६.०९.२०२६ (शुक्रवार/शनिवारची रात्र) रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि परतीच्या प्रवासासाठी ४ विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील.

या विशेष गाड्या खाली दिलेल्या वेळेनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कल्याण/ठाणे/पनवेल दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील.

डाऊन मेन मार्गावर (दिनांक २३/२४.०९.२०२६; दिनांक २४/२५.०९.२०२६ आणि दिनांक २५/२६.०९.२०२६ रोजी)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष १: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१:४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३:१० वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-ठाणे विशेष १: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०२:३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०३:३० वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष ३: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०३:२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०४:५५ वाजता पोहोचेल.

अप मेन मार्गावर (दिनांक २३/२४.०९.२०२६; दिनांक २४/२५.०९.२०२६ आणि दिनांक २५/२६.०९.२०२६ रोजी)

कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २: कल्याण येथून ००:०५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०१:३० वाजता पोहोचेल.

ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २ ही गाडी ठाणे येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०२.०० वाजता पोहोचेल.

ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ४ ही गाडी ठाणे येथून ०२.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०३.०० वाजता पोहोचेल.

डाऊन हार्बर मार्गावर (केवळ दिनांक २५/२६.०९.२०२६ रोजी)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष १ ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०२.५० वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष ३ ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०२.४५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०४.०५ वाजता पोहोचेल.

अप हार्बर मार्गावर (केवळ दिनांक २५/२६.०९.२०२६ रोजी)

पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २ ही गाडी पनवेल येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०२.२० वाजता पोहोचेल.

पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ४ ही गाडी पनवेल येथून ०१.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०३.०५ वाजता पोहोचेल.

प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी गणपती उत्सवासाठीच्या या विशेष उपनगरीय रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande