परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समिती सोमवारी छत्रपती संभाजीनगरात
छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी गठित राज्य भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समिती सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या दौऱ्यावर येत आहे. यावेळी सकाळी १०.३० ते दु
परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समिती सोमवारी छत्रपती संभाजीनगरात


छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी गठित राज्य भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समिती सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या दौऱ्यावर येत आहे.

यावेळी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था, कोचिंग सेंटर व हितसंबंधित घटकांशी संवाद होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते १.३० या वेळेत पत्रकार परिषद, तर दुपारी २.३० नंतर जिल्हास्तरीय उमेदवार व इतर भागधारकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात येणार आहे.भरती परीक्षा पद्धतीबाबत अनुभव व सूचना मांडू इच्छिणाऱ्या संबंधितांनी या संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande