छ.संभाजीनगर - कच्चीघाटीत बिबट्याचे दर्शन! हरणांच्या कळपामागे फिरताना कॅमेऱ्यात कैद
छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची स्थानिक नागरिकांची वनविभागाकडे मागणी छत्रपती संभाजीनगर शहरातील कच्चीघाटी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. कच्चीघाटी परिसरातून हरणा
छ.संभाजीनगर - कच्चीघाटीत बिबट्याचे दर्शन! हरणांच्या कळपामागे फिरताना कॅमेऱ्यात कैद


छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)।

बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची स्थानिक नागरिकांची वनविभागाकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर शहरातील कच्चीघाटी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. कच्चीघाटी परिसरातून हरणांचा एक कळप जात असताना, त्याच्या मागोमाग बिबट्या फिरत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले.

नागरिकांनी सुरक्षित अंतरावर राहून या बिबट्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. या भागात बिबट्याचा वावर स्पष्ट झाल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, वनविभागाने तातडीने दखल घेऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा किंवा त्याला जेरबंद करावे, अशी आक्रमक मागणी परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande