ई-पिक पाहणी कामकाजाची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी
सोलापूर, २ सप्टेंबर (हिं.स.) : म बाणेगाव येथे ई-पिक पाहणी (DCS) कामकाजाची आज निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ई-पिक पाहणीच्या सद्यस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती घेण्यात आली. ई-पिक पाहणीच
Pik Veema


सोलापूर, २ सप्टेंबर (हिं.स.) : म बाणेगाव येथे ई-पिक पाहणी (DCS) कामकाजाची आज निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ई-पिक पाहणीच्या सद्यस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती घेण्यात आली. ई-पिक पाहणीचे काम अधिक प्रभावीपणे व अचूकपणे पूर्ण करण्याच्या सूचना श्री. पाटील यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

पाहणीदरम्यान ई-पिक पाहणी प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती घेण्यात आली. पीक नोंदणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी, नोंदणी प्रक्रियेतील अडथळे तसेच आवश्यक मार्गदर्शन याबाबत श्री. पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली.

ई-पिक पाहणीची नोंद अचूक आणि निर्धारित वेळेत होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेने शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिल्या. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी नायब तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी, पीक पाहणी सहाय्यक, पोलीस पाटील तसेच शेतकरी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ई-पिक पाहणीचे काम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी श्री. पाटील यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या.

शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणीची नोंद करताना आपल्या पिकांची माहिती अचूकपणे नोंदवावी. नोंदणीदरम्यान तांत्रिक अथवा अन्य कोणतीही अडचण उद्भवल्यास संबंधित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ई-पिक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पीक क्षेत्राची अचूक माहिती शासनाच्या अभिलेखात उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग तसेच महसूल यंत्रणेचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

-----------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande