‘शहरी गरीब आरोग्य योजने’चा नागरिकांनी लाभ घ्यावा : अतिक सय्यद
पुणे, 20 सप्टेंबर (हिं.स.)। पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजनांचा पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक अतिक सय्यद यांनी केले.‘लोकसंव
PMC news


पुणे, 20 सप्टेंबर (हिं.स.)। पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजनांचा पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक अतिक सय्यद यांनी केले.‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत माती गणपती मंडळ येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सुविधा आणि योजनांची माहिती दिली.यामध्ये ‘शहरी गरीब आरोग्य योजना’ महत्त्वाची असून, या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध उपचारांसाठी आरोग्य कार्डाचा उपयोग करता येतो, अशी माहिती सय्यद यांनी दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.‘शहरी गरीब आरोग्य योजने’साठी पात्र असलेल्या नागरिकांनी योजनेची सविस्तर माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करावी आणि उपलब्ध आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सय्यद यांनी केले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘लोकसंवाद-२०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्यविषयक योजनांचीही जनजागृती करण्यात येत आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले. यावेळी सारथी संस्थेचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी अनिल पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आणि सारथीचे अभय पालवणकर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande