
नांदेड, 22 सप्टेंबर (हिं.स.)। आज नांदेड-वाघाळा महानगरपालिका व पोलीस प्रशासनाची गणेश विसर्जनाच्या नियोजनाबाबत बैठक शिवसेना आमदार आनंद बोंढारकर व आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी प्रशासनाने केलेल्या तयारीचा तसेच विविध विभागांकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला आणि गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत, शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात, यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.
बैठकीतील प्रमुख मुद्दे :
विसर्जन घाटांवर आवश्यक सुरक्षा व स्वच्छता व्यवस्था
नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था व प्राथमिक उपचार सुविधा
विसर्जन मार्गावरील वाहतूक नियोजन
मिरवणुकीदरम्यान पोलीस बंदोबस्त व सीसीटीव्ही निगराणी
गणेश मंडळांना वेळेत विसर्जनासाठी आवश्यक सूचना
मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी क्रेन व इतर आवश्यक यंत्रणा
निर्माल्य संकलन व पर्यावरणपूरक विसर्जनाची व्यवस्था
नदी, तलाव व जलस्रोतांमध्ये सुरक्षिततेची विशेष काळजी
आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन व आपत्कालीन पथकांची तयारी
नागरिक व गणेश मंडळांना प्रशासनाने १००% सहकार्य करण्याच्या सुचना दिल्या..
यावेळी मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,अतिरिक्त आयुक्त निलेश सुनकेवार,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर रामेश्वर वैजने,उपविभागीय पोलिस अधिकारी इतवारा प्रशांत शिंदे,शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे,जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे,शहरप्रमुख तुलजेश यादव,शहरप्रमुख सुहास खराणे पाटील,शिवसेना गटनेते नगरसेवक संदीपसिंघ गाडीवाले,उपायुक्त तथा नगरसचिव अजितपालसिंघ संधू,नगरसेवक सुहास कल्याणकर,नगरसेवक योगेश मुंडे,शहरप्रमुख उमेश दिघे,रवींद्रसिंग बंगई,माजी महिला व बालकल्याण सभापती अपर्णा नेरलकर,महानगरप्रमुख दिपक स्वामी,राजेश चव्हाण, धम्म कदम,गणेश हालकोडे,श्याम पाटील वानखेडे,सुनील भालेराव,मनमितसिंघ कुजीवाले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक,मनपा अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis