छ. संभाजीनगर महापालिसेक तीन महिन्यांपासून कंत्राटी कर्मचारी बिनपगारी
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील सुमारे २१०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीची बिले महापालिकेकडे थकीत असल्याने एजन्सींनी कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवले आहे
छ. संभाजीनगर महापालिसेक तीन महिन्यांपासून कंत्राटी कर्मचारी बिनपगारी


छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील सुमारे २१०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीची बिले महापालिकेकडे थकीत असल्याने एजन्सींनी कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवले आहे.

तसंच एजन्सीने पगाराची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी कपातीचा इशारा दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळातही कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत. विशेष म्हणजे, विद्यमान कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत असतानाच आणखी २०० कर्मचारी घेण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. मनपातील सहा एजन्सींपैकी चार एजन्सींकडे सुमारे १९०० कर्मचारी आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मासिक खर्च सुमारे ४ कोटी ८० लाख रुपये आहे. नव्या २०० कर्मचाऱ्यांची भर पडल्यास हा खर्च पाच कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande