जिंतूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिके संकटात
परभणी, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। तालुक्यात यंदा पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. अनेक भागांत आवश्यक पाऊस न झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर यांसह विविध पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिके सुकण्याच्या अवस्थेत आहेत. या पार्श्
जिंतूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिके संकटात


परभणी, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। तालुक्यात यंदा पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. अनेक भागांत आवश्यक पाऊस न झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर यांसह विविध पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिके सुकण्याच्या अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी सुरेखाताई शेवाळे यांनी केली आहे.

पावसाचा दीर्घ खंड पडल्याने खरीप हंगामासाठी शेतकर्यांनी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिकांना पाण्याची नितांत गरज असताना पावसाने ओढ दिल्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता तालुक्यातील प्रत्यक्ष परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पावसाअभावी नुकसान झालेल्या खरीप पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकर्यांना पीक नुकसानभरपाई तसेच पीकविम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही शेवाळे यांनी केली आहे. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शासनाने जिंतूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, जिंतूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यापूर्वीही विविध शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही तालुक्यात दीर्घकाळ पावसाचा खंड पडल्याने पिकांवर संकट ओढविल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परभणी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकर्यांनी आंदोलनही केले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन जिंतूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी सुरेखाताई शेवाळे यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande