धुळे शहर विकास योजनेतील भुखंडावरील आरक्षणात बदल
मुंबई, 22 सप्टेंबर (हिं.स.)। धुळे शहराच्या मंजूर विकास योजनेतील धुळे महानगरपालिका हद्दीतील मौजे देवपूर (ता. धुळे) येथील सर्व्हे क्र. १०३ वरील क्रीडांगण व बगीचा यांचे आरक्षण रद्द करून, ते सार्वजनिक – निमसार्वजनिक विभागात समाविष्ट करण्यास आज झालेल्या
धुळे शहर विकास योजनेतील भुखंडावरील आरक्षणात बदल


मुंबई, 22 सप्टेंबर (हिं.स.)। धुळे शहराच्या मंजूर विकास योजनेतील धुळे महानगरपालिका हद्दीतील मौजे देवपूर (ता. धुळे) येथील सर्व्हे क्र. १०३ वरील क्रीडांगण व बगीचा यांचे आरक्षण रद्द करून, ते सार्वजनिक – निमसार्वजनिक विभागात समाविष्ट करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे धुळे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

धुळे विकास योजनेतील नियोजनानुसार महापालिका हद्दीतील मौजे देवपूर येथील सर्व्हे क्र. १०३ पै. या जमिनीवरील काही भागावर क्रींडागण व बगीचा यांचे आरक्षण आहे. यातील २ हेक्टर ८८५ आर क्षेत्राची मालकी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, धुळे यांच्याकडे आहे. या जागेवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, धुळे यांच्याकडून वाहन तपासणी, वाहन नोंदणी व लायसन्स चाचणी आदी कामे केली जातात. या ठिकाणी तपासणी पथकासाठी व अन्य इमारतीचे बांधकाम सुरु असून त्याकरिता सुमारे ९४ लाख ५० हजार रुपये खर्च करण्यात आलेला आहे.

त्यामुळे याठिकाणचे क्रीडांगण व बगीचा आरक्षण वगळून हे क्षेत्र सार्वजनिक निमसार्वजनिक या वापर विभागात समाविष्ट करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन विभागाने महापालिकेला विनंती केली होती. त्यानुसार हा फेरबदल प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला, त्यास मंत्रिमंडळाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमातील तरतुदींस अनुसरून मान्यता दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande