छ. संभाजीनगर : नळाला मोटार जोडणे,रस्त्यावर पाणी सोडल्यास दंड
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा अधिक काटेकोर करण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलण्याची तयारी केली आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेतून ज्या भागात पुरेशा दाबाने पाणी मिळेल, तेथे नळाला लावलेल्या विद्युत मोटारी
छ. संभाजीनगर : नळाला मोटार जोडणे,रस्त्यावर पाणी सोडल्यास दंड


छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा अधिक काटेकोर करण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलण्याची तयारी केली आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेतून ज्या भागात पुरेशा दाबाने पाणी मिळेल, तेथे नळाला लावलेल्या विद्युत मोटारी बंद करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. नळाचे पाणी रस्त्यावर सोडणे, वाहने धुणे तसेच पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर ऑक्टोबरपासून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. २७४० कोटी रुपयांची ३९२ एमएलडी क्षमतेची नवीन पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात असून सध्या त्यातून शहराला १०० एमएलडी पाणी मिळत आहे. पुढील वर्षी जूनपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक नळाला तोटी लावणे बंधनकारक करण्यात येणार असून पाइपलाइन गळती रोखण्याचेही प्रशासनापुढे आव्हान आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande