
परभणी, 22 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी येथीलवनामकृविच्या पाच कृषी वाणांना मिळाली मान्यता मिळाली आहे यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात आहेदापोली जि. रत्नागिरी येथे पार पडलेल्या संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीच्या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने सादर केलेल्या कृषि तंत्रज्ञानाच्या ४१ शिफारशींना मान्यता मिळाली आहे. तसेच विद्यापीठाने सादर केलेल्या सर्व पाच वाणांच्या आणि चार कृषी अवजारांच्या शिफारशींनाही मान्यता मिळाली या बैठकीत देण्यात आली. मान्यता मिळालेल्या संशोधनात, सोयाबीनचा ‘एमएयूएस-७९१’, आंब्याचा ‘राजकेशर (एफआरएसएमसी-१)’, खरबुजाचा ‘परभणी खरबूज’, ‘परभणी दुधी भोपळा ’ आणि ‘परभणी कारले’ या वाणांचा समावेश आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis