वसतिगृह व स्वयंम योजनांच्या अर्जांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
तांत्रिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन रायगड, २२ सप्टेंबर (हिं.स.)। शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (OBC/SBC/VJNT/NT-A, B, D) आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना (NT-C
वसतिगृह व स्वयंम योजनांच्या अर्जांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


तांत्रिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

रायगड, २२ सप्टेंबर (हिं.स.)। शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (OBC/SBC/VJNT/NT-A, B, D) आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना (NT-C) अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता नवीन विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करता येणार आहेत.याबाबतची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक, रायगड-अलिबाग, सुनील जाधव यांनी दिली.

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १२ वी नंतर सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना यांचा समावेश आहे.

या योजनांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यासाठी वसतिगृह प्रवेश प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावरून अर्ज सादर करता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्यांनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड-अलिबाग यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande