हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे विठ्ठल वायाळ यांचा सेवापूर्ती सोहळा पार
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे (नाना) यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत ज्ञान, मूल्ये आणि उत्तम संस्कारांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिश
अ


छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे (नाना) यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाच्या आमदार अनुराधा चव्हाण

यांच्या उपस्थितीत ज्ञान, मूल्ये आणि उत्तम संस्कारांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे विठ्ठल वायाळ यांचा सेवापूर्ती सोहळा पार पडला.

वरुड येथील ‘पंडित दीनदयाल शिक्षण संस्था संचलित जुनेश्वर विद्यालयात’ महामहिम राज्यपाल मा.श्री.हरिभाऊ बागडे (नाना) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहून पुढील निरोगी व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सरांच्या संस्कारातून व मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी घडले आहेत. त्यांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा त्यांच्या कार्याचा खरा गौरव आहे. वायाळ सरांनी आयुष्यभर केलेले ज्ञानदान आणि रुजवलेले संस्कार हा या परिसरासाठी अत्यंत मोलाचा ठेवा आहे.

याप्रसंगी आमदार श्री.सुहासभाऊ शिरसाठ, सभापती श्री.श्रीरामबाबा शेळके, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्री.रामुकाका शेळके, श्री.सजननाना मते, खरेदी-विक्री संघाचे संचालक श्री.भावरावमामा मुळे, बाजार समितीचे संचालक श्री.दत्ताभाऊ उकिर्डे, नगरसेवक श्री.शिवाजी दांडगे, माजी जि.प.सदस्या सौ.साधनाताई कुलकर्णी, पं.स.सदस्य श्री.शेखर दांडगे, ग्रामस्थ, शिक्षक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande