हर्सूल कारागृहात बंदीजनांसाठी भव्य आरोग्य शिबिर
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल मध्यवर्ती कारागृहात COLS प्रशिक्षण आणि मोफत वैद्यकीय शिबिर घेण्यात आले. जिल्हा न्यायालय, धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि IMA यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. म
Q


छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल मध्यवर्ती कारागृहात COLS प्रशिक्षण आणि मोफत वैद्यकीय शिबिर घेण्यात आले. जिल्हा न्यायालय, धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि IMA यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत बंदीजनांना आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी COLSचे प्रशिक्षण देण्यात आले. बंदीजनांना शिक्षा भोगत असतानाही कौशल्यपूर्ण आणि सकारात्मक नागरिक म्हणून समाजात पुनर्वसित करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे न्यायमूर्ती सूर्यवंशी यांनी सांगितले. शिबिरात हृदयरोग, कर्करोग, नेत्र, त्वचा, हाडे, मधुमेह, रक्तदाब यांसह विविध तपासण्या करण्यात आल्या. महिला बंदीजनांची पॅप स्मीअर तपासणीही करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande