
नंदुरबार, २२ सप्टेंबर (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये २४ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित मतदारांनी सुनावणीच्या वेळी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी केले आहे.
या कार्यक्रमांतर्गत तिसऱ्या टप्प्यातील मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरण व पुनर्रचनेची कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ हा कालावधी ‘नोटिस टप्पा’ म्हणून निश्चित करण्यात आला आहे.
या कालावधीत ज्या मतदारांची नावे जुळवणी झालेली नाहीत किंवा जुळवणी झाली असूनही तार्किक विसंगती आढळून आली आहे, अशा मतदारांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. संबंधित मतदारांनी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वैध कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करणे बंधनकारक आहे. आधार कार्ड केवळ ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय सुनावणीचे वेळापत्रक व स्थळ
०१-अक्कलकुवा :
सुनावणी : २८ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर
शहरी भाग : तहसील कार्यालय, अक्कलकुवा; पंचायत समिती, अक्कलकुवा; अपर तहसील, मोलगी.
ग्रामीण भाग : ग्रामपंचायत कार्यालये तसेच वाड्या-पाड्यांवरील जिल्हा परिषद शाळा.
अक्राणी :
सुनावणी : २६ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर
शहरी भाग : तहसील कार्यालय, अक्राणी; नगरपंचायत कार्यालय, अक्राणी; पंचायत समिती, अक्राणी.
ग्रामीण भाग : ग्रामपंचायत कार्यालये तसेच वाड्या-पाड्यांवरील जिल्हा परिषद शाळा.
शहादा :
सुनावणी : २६ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर
शहरी भाग : नगरपरिषद कार्यालय, शहादा.
ग्रामीण भाग : ग्रामपंचायत कार्यालये व जिल्हा परिषद शाळा.
तळोदा :
सुनावणी : २८ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर
शहरी भाग : तहसील कार्यालय, तळोदा; नगरपालिका कार्यालय, तळोदा.
ग्रामीण भाग : ग्रामपंचायत कार्यालये व जिल्हा परिषद शाळा.
नंदुरबार :
सुनावणी : २४ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर
शहरी भाग : तहसील कार्यालय, नंदुरबार; नगरपालिका कार्यालय, नंदुरबार; पंचायत समिती कार्यालय, नंदुरबार.
ग्रामीण भाग : ग्रामपंचायत कार्यालये.
नवापूर :
सुनावणी : २६ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर
शहरी भाग : नगरपरिषद कार्यालय, नवापूर; पंचायत समिती कार्यालय, नवापूर.
ग्रामीण भाग : ग्रामपंचायत कार्यालये.
मतदार यादीतील नोंदींबाबत नोटीस प्राप्त झालेल्या सर्व मतदारांनी निर्धारित कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहावे आणि या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी केले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर