जळगाव : शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जास  ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
जळगाव, 22 सप्टेंबर (हिं.स.) इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यास ३०
जळगाव : शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जास  ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


जळगाव, 22 सप्टेंबर (हिं.स.) इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशासाठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी विहित कागदपत्रांसह https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक संचालक विशाल राठोड यांनी केले आहे. जळगाव शहरात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत मुलांचे शासकीय वसतिगृह, शिव कॉलनी आणि मुलींचे शासकीय वसतिगृह, गिरणा पाणी टाकीजवळ, वाघ नगर रोड येथे कार्यरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande