मनमाड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा खेळेमिळीच्या वातावरणात संपन्न
मनमाड, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। मनमाड नगरपरिषदेची बहुप्रतिक्षित सर्वसाधारण सभा आज, मंगळवारी (२२ सप्टेंबर) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. शहराच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय या सभेत घेण
The general meeting of


मनमाड, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। मनमाड नगरपरिषदेची बहुप्रतिक्षित सर्वसाधारण सभा आज, मंगळवारी (२२ सप्टेंबर) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. शहराच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय या सभेत घेण्यात आले. नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपनगराध्यक्षा कमलताई आंधळे आणि मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.सभा पटलावर ठेवण्यात आलेल्या २९ मुख्य विषयांसह ऐनवेळच्या विषयांवरही सविस्तर चर्चा होऊन त्यांना मंजुरी देण्यात आली.

.सभा पटलावरील २९ विषयांपैकी बहुतांश विषयांवर विनावाद, एकमताने मंजुरीचे शिक्कामोर्तब करण्यात आले. यात शहराच्या सांस्कृतिक व सामाजिक ओळखीशी जोडलेल्या काही महत्त्वाच्या नामांतरांचा समावेश होता यात सिकंदर नगर येथील उर्दू प्रायमरी शाळेचे नामकरण देशातील पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका 'फातिमा शेख' यांच्या नावाने करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.म्युनिसिपल व्यापारी संकुलास 'छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल' असे नवीन नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.आर्थिक लेखापरीक्षण व गाळ्यांच्या लिलावावर चर्चा करण्यात आली लेखापरीक्षण (२०१५ ते २०२३) : नगरपरिषदेच्या आर्थिक वर्ष २०१५-१६ ते २०२२-२३ या प्रदीर्घ काळातील लेख्यांना (ऑडिट/अकाउंट्स) मंजुरी देण्यावरून लोकप्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. अखेर सविस्तर आढाव्यानंतर या लेख्यांना मंजुरी प्रदान करण्यात आली.नगरपरिषदेच्या मालकीच्या गाळ्यांचा लिलाव 'ई-टेंडरिंग' ऐवजी पारदर्शक पद्धतीचा वापर करून 'खुला जाहीर लिलाव' पद्धतीने करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना सदस्यांनी मांडली व ती मान्य करण्यात आली.

मनमाड शहराला आधुनिकतेकडे नेण्यासाठी या सभेत काही कल्याणकारी व पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवण्यात अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शहरात स्वतंत्र व सर्वसुविधायुक्त वाचनालय सुरू केले जाणार आहे.नगरपरिषदेच्या सर्व शाळांचा दर्जा सुधारून त्यांचे आधुनिक डिजिटल शाळांमध्ये रूपांतर केले जाईल.

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande