नामको बँकेच्या अध्यक्षपदी विजय साने तर उपाध्यक्षपदी प्रफुल्ल संचेती बिनविरोध
नाशिक, 22 सप्टेंबर (हिं.स.)। दि नाशिक मर्चेंटस् को- ऑपरेटिव्ह अर्थात नामको बँकेच्या अध्यक्षपदी संचालक विजय साने तर उपाध्यक्षपदी प्रफुल्ल संचेती यांची बिनविरोध निवड झाली. सातपूर येथील बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ही निवड करण्या
नामको बँकेच्या अध्यक्षपदी विजय साने तर उपाध्यक्षपदी प्रफुल्ल संचेती बिनविरोध


नाशिक, 22 सप्टेंबर (हिं.स.)। दि नाशिक मर्चेंटस् को- ऑपरेटिव्ह अर्थात नामको बँकेच्या अध्यक्षपदी संचालक विजय साने तर उपाध्यक्षपदी प्रफुल्ल संचेती यांची बिनविरोध निवड झाली. सातपूर येथील बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ही निवड करण्यात आली.

छोट्या कामगारापासून सुरुवात करून मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास अभिमानास्पद असल्याचे विजय साने यांनी नमूद केले. पुढील वाटचालीत ५ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, शाखांचा विस्तार, स्वच्छ, पारदर्शक कारभार आणि डिजिटल बँकिंग सुविधांवर भर देण्यात येणार आहे. मावळते अध्यक्ष हेमंत धात्रक, सोहनलाल भंडारी व वसंत गिते यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी महापौर हिमगौरी आडके, आमदार सीमा हिरे, माजी महापौर बाळासाहेब सानप, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह संचालक, अधिकारी, सभासद व मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande