
परभणी, 22 सप्टेंबर (हिं.स.)। पुर्णा तालुक्यातील महागाव नवीन येथील ५७ वर्षीय शेतकरी महिला शेतात काम करीत असताना अचानक वीज व पाऊस सुरू झाल्याने आस-यासाठी आखाड्यावर जात असताना अंगावर वीज पडल्याने जागीच मरण पावल्याची घटना घडली असून ताडकळस पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहितीनुसार ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महागाव नवीन येथील सुमित्रा मधुक्रर भालेराव महागाव शिवारातील शेत गट क्रं. ३३४ मध्ये वीज अंगावर पडुन मृत्यु झाला. याप्रकरणी मयत महिलेच्या पतीच्या खपरीवरून ताडकळस पोलिसांत भारतीय नागरिक सुरक्षा संहीता कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनात सिध्दार्थ आचार्य हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis