छ. संभाजीनगर - सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत मंजूर ३३ के.व्ही. उपकेंद्र, अंजनडोह येथील प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथे सेवा संकल्प अभियान तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत मंजूर ३३ के.व्ही. उपकेंद्र, अंजनडोह येथील प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा राजस्थानचे राज्यपाल श्री. हरिभाऊ बागडे (नाना),
Q


छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथे सेवा संकल्प अभियान तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत मंजूर ३३ के.व्ही. उपकेंद्र, अंजनडोह येथील प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा राजस्थानचे राज्यपाल श्री. हरिभाऊ बागडे (नाना), राज्यमंत्रीसौ मेघनाताई बोर्डीकर प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

लाडसावंगी येथील ३३ के.व्ही. उपकेंद्राची क्षमता २० एमव्हीए असून वाढत्या भारामुळे कृषी वाहिन्यांना दिवसा सुरळीत वीजपुरवठा करणे अडचणीचे ठरत होते. यावर उपाय म्हणून अंजनडोह येथे नवीन उपकेंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

विशेष म्हणजे, महामहिम श्री. हरिभाऊ बागडे नाना आमदार असताना याच उपकेंद्रासाठी मंजुरी मिळाली होती आणि आज त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले मातीशी असलेली नानांची नाळ आजही तितकीच घट्ट असल्याचे यातून दिसून येते. या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे

यावेळी आमदार सौ. अनुराधाताई चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरेशभाऊ बनकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. जितेंद्रजी जयस्वाल, सभापती श्री. रामबाबा शेळके, जिल्हा बँक उपाध्यक्ष श्री रामराव काका शेळके, सभापती श्री सर्जेराव मेटे, सभापती श्री कल्याण गायकवाड,जिल्हा परिषद सदस्य, श्री आजिनाथ धामणे, मंडळाध्यक्ष श्री शिवाजी वाघ, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री ऋषी नरोडे, सरपंच श्री दौलत शेजुळ, उपसरपंच श्री यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख तसचे नागरिक उपस्थिती होती.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande